तेजोदिप नवविचार फाऊंडेशनची सुरूवात २०२० साली करण्यात आली आणि २७ ऑगस्ट २०२० रोजी संस्थेचे रजिस्ट्रेशन करण्यात येवून संस्था कार्यरत झाली. आपल्या संस्थेला दि. ४/११/२०२२ रोजी आयकर विभागा मार्फत देणगीदार मान्यवरांना आयकर सुट मिळण्यासाठी कलम ८०जी-१२९ अंतर्गत आयकर सुटसाठी रजिस्ट्रेशन होऊन मान्यता मिळाली आहे. त्यामुळे फाऊंडेशनच्या भविष्यातील उपक्रमात भरीव आर्थिक मदत जमा करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नजीकच्या व भविष्यकाळात आपला प्रत्येक माणुस आधुनिक युगात उद्योग, व्यवसाय, शिक्षण व इतर विविध क्षेत्रात आर्थिकदृष्ट्या महत्वाकांक्षी, आघाडीवर असायला पाहिजे. आपला समाज हा साधारणतः कशातून पुढे आलेला आहे आणि आपल्या समाजातून बऱ्याच लोकांनी प्रतिकुल परिस्थितीतून मार्ग काढत संघर्षातून यश प्राप्त केले आहे. त्यातून प्रेरणा घेवून आपल्या समाजातील नविन तरूणांचा उत्साह द्रिगुणीत (त्यातून बोध घेण्यासाठी) व्हावा त्यासाठी आम्ही बिझनेस नेटवर्कच्या माध्यमातून सुरूवात केली याद्वारे उद्योग व्यवसायात व नोकरीत आपल्या लोकांना मार्गदर्शन मिळत आहे व त्याचा फायदा होत आहे.
याच उद्देशाने आयोजन समितीच्या संकल्पनेतून नाशिक येथे पहिला कार्यक्रम यशस्वी झाला. त्या सकारात्मक प्रतिसादातून ग्रामीण भागातील समाजबांधवांच्या सूचनेनुसार ५ मे २०१९ रोजी भव्य रोजगार मेळावा गाडेगाव येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या दिवशी काही कपंन्या व प्लेसमेंट सर्व्हिसेस यांना आपण आपल्या समाजातील गरजु युवकांना नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यासोबतच समाजातील काही यशस्वी उद्योजक तसेच इतर क्षेत्रातील अनुधवी मान्यवरांच्या सोबत समाजाव्यतिरिक्त नामांकित मार्गदर्शक यांना सुद्धा आपण आमंत्रित केले होते. नवीन उद्योजक व व्यावसायिकांना उपयुक्त माहिती या मेळाव्यातुन मिळाली
या कार्यक्रमाला समाजातील विविध शहरांमधील उद्योजक, डॉक्टर्स, आर्किटेक्ट, शैक्षणिक, औद्योगित क्षेत्रात काम करणाऱ्या समाजबांधांबांची युवक, युवती, महिला व तरूणांना मार्गदर्शन/ मदत व्हावी यासाठी लेवा पाटिदार बिझनेस नेटवर्क २०२२ व्यवसाय परिचय पुस्तिकेचे प्रकाशन व वितरणाची व्यवस्था केली आहे.
समाजातील विविध क्षेत्रातील चांगली कामगीरी करणाऱ्यांना तसेच विशेष प्राविण्य असलेल्या १९ व्यक्तींना फाऊंडेशन तर्फे या कार्यक्रमात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.फाऊंडेशनच्या प्रत्येक उपक्रमात कार्यक्रमासाठी ज्या दात्यांनी अन्नदान व कार्यक्रम पत्रिका व कार्यक्रमासाठी आर्थिक मदत तसेच दिनदर्शिकेसाठी शुभेच्छा जाहिरात देऊन निधी देऊन हातभार लावला तसेच कार्यक्रमासाठी आर्थिक, शारिरीक सहकार्य केले. अशा सर्व व्यक्तिंच्या फाऊंडेशन सदेव कणात राहु इच्छिते व ह्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेचे श्रेय सर्वाचेच आहे.यापुढेही भविष्यात फाउंडेशनच्या प्रत्येक उपक्रमात सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.
संस्थेच्या कार्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे आमच्या मंडळातील सदस्य